Ad will apear here
Next
मोफत ऑनलाइन प्रोग्रामिंग क्लास; अभय भावे यांचा उपक्रम


करोना संसर्गाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे, अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आणि वर्क फ्रॉम होम करू शकत नसलेल्या नागरिकांना हाताशी बराच मोकळा वेळ उपलब्ध झाला. अचानक मिळालेल्या या सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार पर्याय निवडले. आपल्याला ज्या विषयातील ज्ञान आहे, ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेकांना देण्याचे उपक्रमही काही जणांनी राबविले. त्यापैकीच एक म्हणजे रत्नागिरीतील अभय भावे. प्रोग्रामिंग या विषयावर रोज दीड ते दोन तास मोफत ऑनलाइन क्लास घेण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. 

अभय भावेअभय भावे रत्नागिरीतील गद्रे इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीमध्ये सीनिअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहेत. प्रामुख्याने संगणकशास्त्र पदवीच्या द्वितीय वर्षाचे किंवा त्यापुढचे विद्यार्थी, तसेच प्रोग्रामिंग शिकणाऱ्या व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून भावे यांनी ३० मार्चपासून रोजी दुपारी दीड वाजता कोड कँप हा उपक्रम सुरू केला. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना विषयाची थोडी पार्श्वभूमी माहिती असावी, हा त्यामागचा उद्देश आहे. १३ एप्रिलपर्यंत हे क्लास अभय भावे फेसबुक लाइव्हद्वारे घेणार आहेत. प्रोग्रामिंगमागील तीन विचारपद्धती - प्रोसिजरल पॅराडिम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पॅराडिम आणि फंक्शनल पॅराडिम हा कोड कँपचा मुख्य विषय आहे. क्लासच्या शेवटी शंका-समाधानही केले जाते. 

पहिल्या दिवशीच्या सत्रात प्रोग्रामिंग म्हणजे काय, या विषयाचा आढावा घेण्यात आला. तसेच, संगणक, प्रोग्रामिंग आणि गणित या विषयावर भाष्य करण्यात आले. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून, सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच प्रोग्रामिंग शिकणाऱ्या व्यक्तींपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवावी, असे आवाहन भावे यांनी केले आहे.

ज्यांना आधीची लेक्चर्स चुकली आहेत, त्या व्यक्ती अभय भावे यांच्या फेसबुक वॉलवरून लेक्चर्सचे रेकॉर्डेड लाइव्ह व्हिडिओ पाहू शकतात. 

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/bhave.abhay
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWGCL
Similar Posts
इंडस्ट्री 4.0 सध्याचं युग डिजिटल क्रांतीचं आहे. त्यामुळे दर वर्षी तंत्रज्ञानाचा खर्च कमी होतो आणि कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढत चालली आहे. याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे या प्रकारच्या ‘एक्स्पोनेन्शिअल’ तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री 4.0 - नव्या युगाची ओळख’ हे पुस्तक लिहिले आहे
नेक्स्ट एड्युथॉन - एका बदलाची गोष्ट ‘आम्ही शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा आवाका जाणून घेण्याची नेक्स्ट एड्युथॉनची अभिनव कल्पना मांडली, तेव्हा कुणीच आमच्यावर विश्वास ठेवला नाही; पण आम्ही यावर ठाम होतो. आमच्या या छोट्याशा कल्पनेने एका रात्रीत क्रांती नक्कीच घडणार नव्हती; पण बदल घडवण्याची क्षमता तिच्यात होती. एका छोट्या कल्पनेच्या माध्यमातून
रचनाकाराने स्मार्ट, कल्पक असायला हवे : शिल्पकार अभिजित धोंडफळे पुणे : ‘विद्यार्थ्यांमध्ये खूप काही करण्याची ऊर्जा असते. त्याला महाविद्यालयीन स्तरावर वाव दिला पाहिजे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. सगळीकडे ‘स्मार्ट’ असण्याची चर्चा असताना ‘स्मार्ट’ विद्यार्थी घडविणेही तितकेच महत्वाचे आहे. भवताल समजून घेत नव्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे असते. सातत्याने नवीन गोष्टी
डिजिटल शिक्षणपद्धतीला पर्याय नाही करोना व्हायरसचा प्रसार असाच वाढत राहिला तर डिजिटल शिक्षणपद्धतीशिवाय शाळांना आणि पालकांना गत्यंतर नाही. कारण मुलांचे शिक्षण थांबवणे परवडणारे नाही. या शिक्षणपद्धतीचे फायदे आणि तोटे यांवर टाकलेली एक नजर....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language